भाजपला दोन हजार कोटींच्या देणग्या

भाजपला दोन हजार कोटींच्या देणग्या

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षात भारतीय जनता पक्षावर अक्षरशः पैशांचा पाऊस पडल्याचे समोर आले आहे. भाजपला या कालावधीत सर्वाधिक तब्बल 2 हजार 243 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या, अशी माहिती निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱया एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्म्सच्या अहवालातून उघड झाली आहे. भाजपला तब्बल 8 हजार 358 देणगीदारांनी भरभरून देणग्या दिल्याचे अहवालात म्हटले आहे.

राजकीय पक्षांनी 20 हजार रुपयांहून अधिक देणग्यांबाबतची माहिती निवडणूक आयोगाला सादर केली. त्यावर आधारित अहवाल एडीआरने तयार केला आहे. राष्ट्रीय पक्षांना तब्बल 12 हजार 547 देणगीदारांकडून 2 हजार 544.28 कोटी रुपयांच्या एकूण देणग्या मिळाल्या. त्यानुसार 2023-24 च्या तुलनेत त्याआधीच्या वर्षीपेक्षा देणग्यांमध्ये 199 टक्क्यांची वाढ झाल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

88 टक्के देणग्या एकटय़ा भाजपला
सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी एकटय़ा भाजपला तब्बल 88 टक्के देणग्या मिळाल्याचे एडीआरच्या अहवालातून समोर आले आहे. काँग्रेसला 1 हजार 994 देणगीदारांकडून 281.48 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या. 2022-23 या आर्थिक वर्षात भाजपला 719.858 कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;