22 मद्यपीं चालकांचे परवाने रद्द होणार

22 मद्यपीं चालकांचे परवाने रद्द होणार

दारू ढोसून बेदरकारपणे गाडय़ा चालविणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. दोन दिवसांत 22 मद्यपी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांचा परवाना रद्द अथवा निलंबित करण्यात येणार आहे. दारूत तर्रर होऊन निष्काळजीपणे गाडी चालविणाऱ्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. दोन दिवसांत पोलिसांनी 22 मद्यपी चालकांना पकडले. या सर्वांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व चालकांचा चालक परवाना रद्द अथवा निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही धडक कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;