Clove Oil Benefits- गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे लवंग तेल, वाचा लवंग तेलाचे फायदे

Clove Oil Benefits- गुडघेदुखीवर रामबाण उपाय आहे लवंग तेल, वाचा लवंग तेलाचे फायदे

लवंग हा मसाल्याच्या डब्यातील एक महत्त्वाचा मसाला आहे. आरोग्याच्या समस्येवर मात करण्यासाठी, लवंग खूप बहुमोली आहे. आर्युर्वेदामध्ये लवंगेचा वापर हा प्रामुख्याने दुखण्यावर केला जातो. त्यामुळेच लवंग ही दाढदुखीसाठी सुद्धा वापरली जाण्याची प्रथा ही फार पूर्वापासून आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांवर लवंग खूप उपयुक्त आहे.

लवंगेचे आपल्या आरोग्यासाठी काय होतात उपयोग?

दाढदुखीच्या वेदनेवर लवंग हा जालिम इलाज मानला जातो. अनेकदा दाढ दुखल्यावर, लवंग दाढेमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

 

लवंग ही डोकेदुखीवर पण वापरण्याचा सल्ला दिला जातो. लवंगेचे तेल हे डोकेदुखीवर जालीम इलाज आहे. लवंगेच्या तेलातील दाहक गुणधर्म डोकेदुखीचा समूळ नाश करतात.

 

आपले डोके ठणकत असेल तर, लवंगेमुळे ही ठणकही कमी होते. तसेच लवंग तेल आपल्या गुडघ्यांसाठी सुद्धा खूप उपयुक्त मानले जाते.

गुडघेदुखीची समस्या असणारे बरेचदा लवंग तेल आणि खोबरेल तेल एकत्र करून गुडघ्यांना लावतात. त्यामुळे गुडघेदुखीचे प्रमाण अंशतः कमी होते.

 

खोबरेल तेलामध्ये लवंग तेल मिसळून त्यात थोडे मीठ घालावे. हे मिश्रण दुखणाऱ्या भागावर चोळल्यास दुखणे कमी होण्यास मदत होते.

 

लवंग तेल हे केसांसाठी सुद्धा खूप उत्तम आहे, त्यामुळे केसगळती रोखण्यासाठी लवंग तेल हे महत्त्वाचे आहे.

लवंग तेल आणि तिळाचे तेल मिक्स करून केसांना लावल्याने, केस गळती कमी होते. तसेच केसांना चकाकी सुद्धा प्राप्त होते.

 

दात दुखल्यावर आता त्या ठिकाणी लवंग ठेवण्यापेक्षा लवंग तेल लावणे केव्हाही सोयिस्कर आहे. त्यामुळे दातदुखीपासून नक्कीच आराम मिळेल.

 

लवंग तेलाचा उपयोग आर्थरायटिस, डोकेदुखी इत्यादी समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण करू शकतो.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;