Pathaan- ‘अपनी कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बिगडने वाला है’! लवकरच ‘पठाण-2’ भेटीला येतोय..

Pathaan- ‘अपनी कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बिगडने वाला है’! लवकरच ‘पठाण-2’ भेटीला येतोय..

‘पार्टी पठान के घर पे रखोगे तो मेहमान नवाजी के लिए पठान तो आएगा और पटाखे भी लाएगा’ 2023 मध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण या दोघांचा पठाण सुपरहिट ठरला. ‘पठाण’ गाजला तो त्यातील संवादांमुळे म्हणूनच आजही ‘पठाण’मधले कित्येक संवाद आपल्या प्रत्येकाच्या ओठी आहेत. ‘हम ना किसी माँ के लाडले हैं, ना किसी के बाप के नौकर, अपनी मर्जी से काम करते हैं, अपनी कीमत पर’, ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ हे संवाद आजही तितकेच लोकप्रिय आहेत.

शाहरुख आणि दीपिकाचा ‘पठाण-2’ येणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील वर्षी ‘पठाण-2’ चे शूटिंग सुरु होणार असल्याची माहिती नुकतीच मिळालेली आहे. शाहरुख आणि दीपिकाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ‘पठाण-२’ च्या शूटिंगला विलंब होत असल्याचे समजते.

‘पठाण-2’ येत असल्याचे वृत्त नुकतेच यशराज फिल्म्स यांच्याकडून अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. 2023  मध्ये पठाणने 1000 कोटींपेक्षा अधिक कमाई करून, तिकीटबारीवर स्वतःचा दबदबा निर्माण केला होता.

 

‘पठाण-2’ मध्ये शाहरुख खान आणि दीपिका आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आगामी सिक्वेलमध्ये अधिकाधिक रोमांचक आणि साहसी दृश्यांचा भरणा असणार आहे. याकरता आदित्य चोप्रा यांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे.

सध्याच्या घडीला शाहरुख खान हा सुहाना खान म्हणजेच त्याच्या लेकीसोबत एका चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव ‘किंग’ असे आहे. त्यामुळेच शाहरुखला या वर्षी शूटींगसाठी अजिबात वेळ नाही. म्हणूनच ‘पठाण-2’ चे शूटींग हे पुढच्या वर्षी सुरु करण्यात येणार आहे. दीपिका सुद्धा यावर्षी दोन चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे या दोघांच्या तारखांसाठीच ‘पठाण-2’ चे शूटींग हे पुढच्या वर्षी करण्याचे ठरवलेले आहे. ‘पठाण-2’ ची पटकथा ही तयार असून, आता फक्त शूटींग सुरु होण्यासाठी टीमकडून वाट बघण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;