व्हॉट्सअ‍ॅप आणखी होणार रंगतदार

व्हॉट्सअ‍ॅप आणखी होणार रंगतदार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आवाज आणि व्हिडीओ कॉल्सच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्यासाठी पावले टाकली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच विविध फीचर्सची ओळख करून दिली आहे. नवीन फीचर्सबाबत डब्ल्यूएबीटाइन्फोला व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनमध्ये म्युट बटण, व्हिडीओ कॉलमध्ये सुधारणा आणि इमोजी फीचर अशा सुधारणा आढळल्या.

म्युट बटण – व्हॉट्सअ‍ॅप एक म्युट बटण आणणार असून त्यामुळे वापरकर्त्यांना कॉलच्या नोटिफिकेशनला म्युट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. या फीचर्समुळे वापरकर्ते कॉल स्वीकारताना त्यांचा मायक्रोफोन म्युट ठेवू शकतील.

व्हिडीओ कॉलमध्ये सुधारणा – कंपनीच्या नवीन अपडेटनुसार वापरकर्त्यांना आता कॉल स्वीकारण्यापूर्वीच त्यांचा व्हिडीओ बंद करण्याची सुविधा असेल. त्यामुळे कॅमेरा बंद करायचा असल्यास कॉल घेण्यापूर्वीच व्हिडीओ बंद करता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;