सगळी चूक रुग्णालयाची असे म्हणता येणार नाही, हॉस्पिटलच्या बचावासाठी मुख्यमंत्री धावले

सगळी चूक रुग्णालयाची असे म्हणता येणार नाही, हॉस्पिटलच्या बचावासाठी मुख्यमंत्री धावले

दीनानाथ मंगेशकर हे रुग्णालय लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने खूप मेहनतीने उभारले आहे. या रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. या रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही, मात्र कालचा प्रकार हा असंवेदनशील होता, अशी बचावात्मक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकरणाबाबत जोपर्यंत मी नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत या प्रकरणावर बोलणे योग्य ठरणार नाही, मात्र रुग्णालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. सरकारने या घटनेची दखल घेतली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कालपर्यंत समजू शकत होतो. लोकांमध्ये राग होता. मात्र, आता काही लोक आंदोलनाची ‘शो बाजी’ करत आहे. डॉ. घैसास यांच्या रुग्णालयाची झालेली तोडफोड समर्थनीय नाही. त्यामध्ये भाजपची महिला आघाडी सहभागी असेल तरी हे कृत्य चूक आहे, त्यांनी सांगितले.

फडणवीसांनी घेतली भिसे कुटुंबीयांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर

पुण्यातील या घटनेनंतर धर्मादाय आयुक्तांना नव्याने काही अधिकार देण्यात आले आहेत. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी एक एसओपी तयार करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण धर्मादाय व्यवस्था एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर यावी, हा आमचा प्रयत्न आहे. ही व्यवस्था मुख्यमंत्री आरोग्य कक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;