बीडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

बीडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुबियांची भेट घ्यायला मस्साजोग येथे आलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचाच फोन चोरीला गेला आहे. योगेश कदम यांनी केज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. जिथे इतकी सुरक्षा यंत्रणा घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांचाच फोन सुरक्षित नाही तिथे सामान्य जनतेचे काय होणार, असा सवाल लोकांमधून केला जात आहे.

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा खास असलेला वाल्मीक कराड याचाही समावेश आहे. वाल्मी कराड याच्या सांगण्यावरून  विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आऱोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;