‘वादळवाट’ फेम प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन

‘वादळवाट’ फेम प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांचं निधन

चार दिवस सासूचे, दामिनी आणि वादळवाट सारख्या टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 62 व्या वर्षी उजवणे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. तर मनोज कुमार यांच्या नंतर विलास उजवणे यांचंही निधन झाल्याने सिनेक्षेत्राला मोठा झटका बसला आहे.

डॉ. विलास उजवणे हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांना काही वर्षांपूर्वी ब्रेन स्ट्रोकही आला होता. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला होता. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होत होता. गंभीर आजारामुळे उपचाराचा खर्च वाढत असल्याने त्यांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागला होता. त्यांच्या मित्र परिवाराकडून आर्थिक मदतीचं आवाहनही करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.

हिंदीतही ठसा उमटवला

उजवणे हे रंगभूमीवरचे कलाकार होते. नाटकांमध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर त्यांनी थेट टीव्ही मालिकांकडे आपला मोर्चा वळवला होता. त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ते घराघरामध्ये पोहोचले होते. प्रेक्षकांनी त्यांना नकारात्मक भूमिकांमंध्येही स्वीकारले होते. उजवणे यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

गाजलेल्या मालिका

चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ आदी त्यांच्या मालिका विशेष गाजल्या. उजवणे यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ११० चित्रपट, विविध १४० मालिकांमध्ये काम केलं. तसेच व्यावसायिक नाटकांचे त्यांनी तब्बल ३ हजारांहून अधिक प्रयोग केले आहेत. मात्र, असं असलं तरी उजवणे यांना ओळख मिळाली ती टीव्ही मालिकांमधून. टीव्ही मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. या भूमिकांमुळेच ते घराघरात पोहोचले. उजवणे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;