बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिकांचे कायदेशीर कर्तव्यच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिकांचे कायदेशीर कर्तव्यच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

बेकायदा बांधकामांविरुद्ध कारवाई करणे हे महापालिकांचे कायदेशीर कर्तव्यच आहे. कायदा धाब्यावर बसवून उभारलेली बांधकामे खपवून घेताच कामा नयेत, असे महत्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. नालासोपारा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवले.

नालासोपारा येथील रहिवाशी संदीप मिश्रा यांनी बेकायदा बांधकामांकडे लक्ष वेधत जनहित याचिका दाखल केली. बिल्डर बेकायदा बांधकामे उभी करतात. त्यांच्यावर कारवाई करण्यात पालिका प्रशासन गांभीर्य दाखवत नाही. त्यामुळे अशा बेकायदा इमारतींमध्ये घर खरेदी करणाऱ्या निरापराधी लोकांचे मोठे नुकसान होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

नालासोपारा परिसरातील बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या विकासक व बिल्डरांना प्रभाग सहाय्यक आयुक्तांनी नोटीसा बजावल्या. मात्र पुढील कारवाई केली नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. याची गंभीर दखल मुख्य न्यायमूर्ती आराधे यांच्या खंडपीठाने घेतली आणि वसई विरार महापालिका प्रशासनाला फटकारले. याचवेळी नालासोपारा परिसरात असलेल्या बेकायदा बांधकामांवर वेळीच कारवाई करण्याचे आदेश देत जनहित याचिका निकाली काढली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;