Facewash- घरातील या गोष्टींपासून बनवा नैसर्गिक फेसवाॅश! त्वचा मुलायम राहील आणि चमकदार होईल

Facewash- घरातील या गोष्टींपासून बनवा नैसर्गिक फेसवाॅश! त्वचा मुलायम राहील आणि चमकदार होईल

चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी आपण रासायनिक स्क्रबर वापरतो. तसेच चेहरा धुण्यासाठी आपण विविध फेसवॉशचा वापर करतो. परंतु रासायनिक घटकांमुळे आपल्या त्वचेला कोरडेपणा येतो. त्यामुळे त्वचेवर कोरडेपणासोबत खाज सुटणे, पुरळ येणे आणि मुरुम येणे यासारख्या समस्या देखील कायम राहतात. अशा परिस्थितीत, वारंवार मॉइश्चरायझिंग करणे आवश्यक असते, परंतु कामामध्ये मात्र ते शक्य नसते. म्हणूनच या समस्येवर मात करण्यासाठी एक प्रभावी पर्याय म्हणजे त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर करायला हवा. तुमच्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत, यांनी चेहरा धुतल्याने प्रथम चमक वाढते आणि दुसरे म्हणजे त्यातील ओलावा टिकून राहतो.

 


बेसन
फेसवॉश नव्हता तेव्हा आंघोळीसाठी आणि चेहरा धुण्यासाठी बेसनाचा वापर सर्रास केला जात असे. बेसन त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि त्वचेची चमक वाढवते आणि त्वचा मुलायम ठेवते. यासाठी बेसनात चिमूटभर हळद मिसळा आणि त्यात गुलाबपाणी किंवा दही घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि थोडेसे कोरडे होऊ द्या, नंतर पाण्याने धुवा.

काकडी
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे काकडी खाण्यासोबतच ती चेहऱ्यावर लावणे हे दोन्ही फायदेशीर आहे. काकडी किसून चेहऱ्यावर घासून घ्या किंवा त्यात दही मिसळून चेहऱ्यावर लावा आणि ५ मिनिटे तसेच राहू द्या. ओलावा आणि चमक दोन्ही अबाधित राहतील.

 

कोरफड
कोरफडीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म त्वचेची चमक वाढवण्यास मदत करतात. शिवाय, ते त्वचेला हायड्रेट ठेवते. चेहऱ्यावर वापरण्यासाठी, एका भांड्यात कोरफडीचे जेल घ्या. त्यात बेसन मिसळा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

 

तुळस
तुळशीचा वापर त्वचेला अनेक फायदे देतो. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक असतात, जे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारचे संक्रमण दूर करण्यास मदत करतात. यासाठी तुळशीची पाने धुवून स्वच्छ करा आणि बारीक करा. त्यात एक चमचा मध मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुमारे १५ मिनिटांनी पाण्याने धुवा.

 

(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी केली मारहाण, मुलीचा मृत्यू; सांगलीतली धक्कादायक घटना परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी केली मारहाण, मुलीचा मृत्यू; सांगलीतली धक्कादायक घटना
परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांनी आपल्या मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला आहे. सांगलीतल्या आटपाडीत ही...
Iran Israel War – अमेरिकेच्या एअरस्ट्राइकनंतर इराण संतापला; आता ठोस कारवाई करा! सैन्याला दिला फ्री हॅन्ड
पक्ष फोडण्यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांनीच भय आणि भ्रष्टाचारनिर्मिती केली; संजय राऊत यांचा हल्लाबोल
महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे; संजय राऊत यांचा घणाघात
Iran Israel War – ट्रम्पला इराणचा फक्त ‘फोर्डो’ नष्ट करायचा होता! नेत्यानाहू FINISH THE JOB म्हणत काय म्हणाले
आता मतदार ओळखपत्राची होणार Home Delivery, ते ही फक्त 15 दिवसांत
गेल्या 15 वर्षांत लोकल अपघातात मृत पावलेल्यांपैकी एक तृतीयांश मृतदेहांची ओळखच पटली नाही, माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती