गूगल मॅपने पुन्हा दिला धोका, चुकीचे लोकेशन दाखवल्याने कार राँग साईडला गेली अन् दोन तरूणींचा करुण अंत

गूगल मॅपने पुन्हा दिला धोका, चुकीचे लोकेशन दाखवल्याने कार राँग साईडला गेली अन् दोन तरूणींचा करुण अंत

हल्ली कुठेही जायचे असेल तर गूगल मॅपचा वापर सर्वच जण सर्रास करतात. मात्र गूगल मॅपमुळे अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे घडली. गूगल मॅपच्या मदतीने हरियाणाला चाललेल्या तरुणांची कार राँग साईडला गेली. यावेळी कार कंटेनरला धडकून दोन तरुणींचा जागीच मृत्यू झाला. यात दोन तरून जखमी झाले आहेत.

दोन तरुण आणि दोन तरुणी गूगल मॅपच्या मदतीने रस्ता शोधत होते. यावेळी गूगलने दाखवलेल्या लोकेशननुसार गाडी बायपासवरून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर राँग साईडला गेली. यावेळी समोरून भरधाव येणाऱ्या कंटेनरला कार धडकली. कंटेनरला धडकल्यानंतर कारचा चक्काचूर झाला आणि दरवाजे लॉक झाले. मोरादाबादमधील मुंडा पांडे हद्दीतील बायपास रोडवर घडली.

या अपघातात कारमधील दोन तरुणी जागीच ठार झाल्या तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले. शिवानी आणि सिमरन अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत. राहुल आणि संजू अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;