टोल वाचवायला गेला अन् घात झाला, बसच्या धडकेत कारमधील चौघांचा मृत्यू

टोल वाचवायला गेला अन् घात झाला, बसच्या धडकेत कारमधील चौघांचा मृत्यू

एक्सप्रेसवेवरील टोल टाळण्यासाठी चालकाने गाडीचा वेग कमी केला. मात्र टोल वाचवण्याच्या नादात चौघांचा जीव गेला. मागून येणाऱ्या भरधाव बसने कारला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेवर गुरुवारी ही घटना घडली. याप्रकरणी मंड्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्नाटकातील मंड्या जिल्हा परिसरात ही घटना घडली. कारमधील कुटुंबीय पिरियापट्टणाला चालले होते. बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवेवरील टोल टाळण्यासाठी कार चालकाने तुबिनाकेरे एक्झिटजवळ गाडीचा वेग कमी केला होता. याचवेळी मागून येणाऱ्या राज्य परिवहनच्या बसने कारला मागून धडक दिली.

या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मंड्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;