‘छावा’चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांसाठी सवाद्य मिरवणूक; मूळगावी भव्य सत्कार
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्नाने मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
या चित्रपटाचं प्रेक्षक-समिक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. चित्रपटाला देशभरात मिळालेल्या प्रतिसादानंतर आता रायगडमधील मोरसडे इथल्या मूळगावी घोसाडवाडी इथं लक्ष्मण उतेकर यांचा सत्कार करण्यात आला आहे.
मोरसडे या मुळगावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List