ठाणेकरांचा कचरा आमच्या दारात नको, डम्पिंगविरोधात भिवंडीकर आक्रमक

ठाणेकरांचा कचरा आमच्या दारात नको, डम्पिंगविरोधात भिवंडीकर आक्रमक

ठाण्याच्या सीपी तलाव परिसरात कचरा टाकण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे कचराकोंडी झालेल्या ठाणे महापालिकेने शहरात गोळा होणारा कचरा सध्या भिवंडीच्या आतकोली येथे टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र ठाणेकरांचा कचरा आमच्या दारात नको, असा आवाज उठवत भिवंडीकरांनी डम्पिंगला विरोध केला आहे. ठाण्यापाठोपाठ भिवंडीतही कचरा पेटल्याने पडघ्याच्या आतकोलीतील 85 एकर जागेवरील डम्पिंग वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीत दररोज अंदाजे 1 हजारांहून अधिक कचऱ्याची निर्मिती होते. हा संपूर्ण कचरा डंपरमार्फत आतकोली क्षेपणभूमी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेला जातो. अख्ख्या ठाणे शहराचा कचरा भिवंडीतील आतकोली गावाच्या हद्दीत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जात असल्याने स्थानिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. या डम्पिंग ग्राऊंडवरविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान, भविष्यात कचऱ्याच्या समस्यांमुळे डोकेदुखी वाढणार असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

येत्या सोमवारी तीव्र आंदोलन
स्थानिकांना विचारात न घेता राज्य सरकारने ही जागा दिली आहे. या जागेवर दररोज 100 हून अधिक कचऱ्याचे डंपर रिकामे केले जात असल्याने दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा श्वास कोंडला जात असल्याने येत्या सोमवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिली आहे.

दुर्गंधीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणार
ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज या भागाची पाहणी करत या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या कामांसाठी राज्य शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले. या प्रकल्पासाठी 12 एकर आणि ग्रॅसनिर्मितीसाठी 10 एकर अशा एकूण 22 एकर जागेचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. तसेच दुर्गंधी, कचरा वाहतुकीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;