हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण

हा देश म्हणजे जेल नाही! संजय राऊतांचे राज्यसभेत तडाखेबंद भाषण

राज्यसभेत आज इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 मांडण्यात आले. या विधेयकावर चर्चा करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. हा देश धर्मशाळा नसला तरी तुरुंग देखील नाही, असं संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले.

जेव्हा इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल संसदेत मांडण्यात आले, तेव्हा गृहमंत्री (अमित शहा) म्हणाले की, हा देश धर्मशाळा नाही आणि आम्ही हा देश धमर्शाळा होऊ देणार नाही. या देशाला धर्मशाळा बनवण्याचा कोणाचाही हेतू नाही. पण हा देश जेलही नाही, असं संजय राऊत राज्यसभेत म्हणाले

बाळासाहेबांचे नाव घेताच संजय राऊत यांनी ठणकावले

यावेळी सत्ताधारी बाकांवरून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला गेला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांना चांगल्याच शब्दात सुनावले. “ए! कोण आहे? कोणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं? तिथून तुम्ही काहीही कमेंट करता. आम्ही ऐकत राहतो, तुम्ही बोलत राहता. तुम्हाला काय माहित आहे, 10 वेळा पक्ष बदलणारे हे लोक आहेत.”

इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल 2025 वर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “गेल्या 10 वर्षात देशातील नागरिकांना एक प्रकारे तुरुंगातच ठेवण्यात आलं आहे. मात्र आता आता वैध पासपोर्टवर आणि व्हिसावर या देशात जे परदेशातील लोक येतील, त्यांनाही कदाचित या कायद्याअंतर्गत तुरुंगात ठेवायचं आहे. या सरकाराच्या कठोर कायद्यात, ज्या प्रकारे अटी घालण्यात आल्या आहेत, अनेक अॅक्ट लादण्यात आले आहेत, यामुळे हळू हळू येथे परदेशी पर्यटकही येणं बंद करतील.”

ते म्हणाले, “हा कायदा हवा, देशात कोणीही बेकायदेशीरपणे राहावे, अशी आमची इच्छा नाही. मग तो बांगलादेशी असो, रोहिंग्या असो, अमेरिकन असो किंवा युरोपियन असो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या हिंदुस्थानी लोकांना जे तिथे बेकायदेशीरपणे राहत होते. त्यांच्या हातात आणि पायात बेड्या ठोकून लष्कराच्या विमानात बसवून इथे पाठवले. हा कायदा पास झाल्यानंतर जर येथे कोणी अमेरिकन बेकायदेशीरपणे राहत असेल तर त्याच पद्धतीने हातात आणि पायात बेड्या ठोकून वॉशिंग्टनला पाठून द्या.”

संजय राऊत पुढे म्हणाले की, “संपून देशात रोहिंग्या आणि बांगलादेशी 3 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. हे सर्वातआधी मुंबईत आम्ही सुरू केलं. सर्वातआधी बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज दिला होता की, येथे एकही बांगलादेशी नाही राहणार.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;