‘आता फक्त दोनच पर्याय उरतात..’; कुणाल कामराच्या नव्या पोस्टने वेधलं सर्वांच लक्ष

‘आता फक्त दोनच पर्याय उरतात..’; कुणाल कामराच्या नव्या पोस्टने वेधलं सर्वांच लक्ष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी तिसऱ्यांदा समन्स बजावले आहेत. 5 एप्रिल रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी पोलिसांनी कुणालला हे समन्स पाठवले आहेत. याआधी पोलिसांनी त्याला दोनदा समन्स बजावले होते. परंतु तरीही कुणाल चौकशीसाठी उपस्थित राहिला नव्हता. कुणालविरोधात राज्यातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. या वादानंतरही तो सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि स्टँडअप कॉमेडीचे व्हिडीओ शेअर करत आहे. आता कुणालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आणखी एक पोस्ट लिहिली आहे.

एकनाथ शिंदेंवरील विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी काही संतप्त शिवसैनिकांनी कुणालच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. ‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन’ असं शीर्षक लिहित त्याने एकंदर परिस्थितीवर निशाणा साधला आहे.

कुणाल कामराची पोस्ट-

‘कलाकाराला कसं मारायचं याचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन
1- आक्रोश- त्यांच्या कामासाठी ब्रँड्सने जाहिराती मिळवून देणं बंद करण्यासाठी पुरेसं आहे.
2- अधिक आक्रोश करा- खासगी आणि कॉर्पोरेट कार्यक्रम संपेपर्यंत
3- आणखी मोठा आक्रोश करा- जेणेकरून मोठमोठी ठिकाणं जोखीम घेणार नाहीत.
4- हिंसक आक्रोश करत रहा- जोपर्यंत सर्वांत लहान ठिकाणंदेखील कार्यक्रमांसाठी त्यांचे दरवाचे बंद करत नाहीत.
5- त्यांच्या प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलवा- कलेचं ठिकाण गुन्हेगारीच्या ठिकाणात बदला.
आता कलाकाराकडे फक्त दोनच पर्याय उरतात: एकतर त्यांचा आत्मा विकून डॉलरची कठपुतळी बनणं किंवा मौन बाळगून कोमेजणं
हे फक्त प्लेबुक नाही, हे एक राजकीय शस्त्र आहे, गप्प बसवण्याचं एक यंत्र आहे,’ असं त्याने लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kamra (@kuna_kamra)

दरम्यान सोमवारी कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. या पाहणीवरूनही कुणालने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून त्याने अधिकाऱ्यांवर वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय केल्याबद्दल जोरदार टीका केली. कामराने किमान दहा वर्षांपासून त्या पत्त्यावर राहत नसल्याचं सांगून तामिळनाडूतील त्याच्या सध्याच्या घराच्या टेरेसवरून स्वत:चा एक फोटो शेअर केला होता.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;