माझगाव डॉक येथे शिवजयंती जल्लोषात, स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

माझगाव डॉक येथे शिवजयंती जल्लोषात, स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडच्या प्रांगणात शिवजयंतीचा सोहळा थाटामाटात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि प्रेरणेची उजळणी करणारा हा सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला.  हा सोहळा केवळ भव्यच नव्हे तर शिस्तबद्ध आणि नेटकाही होता अशा शब्दांत उपस्थितांनी आयोजकांचे तोंडभरून कौतुक केले तसेच अशा कार्यक्रमांनी शिवाजी महाराजांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या भव्य कार्यक्रमाला पंपनीचे D-CP&P कमांडर वासुदेव पुराणिक, डायरेक्टर फायनान्स रुचिर अगरवाल आणि डायरेक्टर सबमरीन व हेवी इंजिनीअरिंग कमोडोर शैलेश जामगावकर यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी आपल्या मार्गदर्शनाने सर्वांना भारावून टाकले.  शिल्पा परब यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषणातून शिव प्रबोधनाचा एक नवा आयाम उलगडला. कार्यक्रमाची सुरुवात स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस किरण शिंदे यांनी आपल्या खुमासदार शैलीतील प्रास्ताविकाने केली, तर सूत्रसंचालनाची धुरा भारतीय कामगार सेनेचे युनिट कार्याध्यक्ष सचिन राऊळ यांनी सांभाळली. युनिट अध्यक्ष सुनील दळवी यांनी आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;