Ratnagiri Accident चाफे येथे अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला

Ratnagiri Accident चाफे येथे अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने ट्रक पेटवला

निवळी-जयगड मार्गावरील चाफे आज मंगळवारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या अपघातात खंडाळा येथील तरुण किरण पागदे ( खंडाळा, वाटद) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला.निवळी-जयगढ रस्त्यावरील अवजड वाहतुकीविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात चाफे गावाजवळ घडला.ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीस्वाराचा मृतदेह रस्त्यावर पडलेला पाहून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ट्रक जळत असताना धुराचे लोट पसरले.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जळालेल्या ट्रकमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;