Share Market Crash – शेअर बाजार 1200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटी बुडाले

Share Market Crash – शेअर बाजार 1200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटी बुडाले

शेअर बाजार मंगळवारी जोरदार कोसळला. शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर आपटल्याने गुंतवणूकदारांचे 3.50 लाख कोटी बुडाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा फटका शेअर बाजाराला बसला आहे. शेअर बाजार 1391 अंकांनी घसरून 76 हजार अंकांच्या खाली आला तर, निफ्टी 23150 अंकांनी खाली आला. सर्वाधिक फटका हा बँकींग आणि आयटी क्षेत्राला बसला. वाहन क्षेत्र सोडले तर सर्व प्रमुख क्षेत्र लाल निशाणावर व्यवहार करताना दिसले. आयटी, रियल्टी, अर्थ आणि कंझ्युमर ड्युरेबल गुड्समध्ये 1-3 टक्के घसरण दिसून आली. बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 3.50 लाख कोटीहून अधिकची घसरण झाली.

गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी स्वाहा

शेअर बाजार कोसळण्याचे प्रमुख कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणासह आणखी तीन कारणे असल्याचे सांगण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर गेल्या पाच आठवड्यांत सर्वाधिक वाढले आहेत. ब्रेंट क्रूड 74.67 डॉलर प्रति बॅरल पर्यंत गेले आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दराचा फटका हिंदुस्थानला बसण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रही दबावात आहे.

2 एप्रिलपासून डोनाल्ड ट्रम्प यांचा रेसिप्रोकल टॅरिफ लागू होणार आहे. सर्व टेरिफ सर्व देशांना लागू असतील. यामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक विकासाची गती मंदावण्याची भीती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;