ऑफिसची डेडलाइन, रोजचा प्रवास, टेन्शन्स यांनी त्रासले आहात; तुमचे टेन्शन्स दूर करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ पर्याय

ऑफिसची डेडलाइन, रोजचा प्रवास, टेन्शन्स यांनी त्रासले आहात; तुमचे टेन्शन्स दूर करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ पर्याय

दिवसभर ऑफिसच्या डेडलाइन, प्रवास आणि इतर अनेक गोष्टींना सामोरे गेल्यानंतर, रात्री आपल्यामध्ये त्राण उरत नाही. याच तणावपूर्ण दिवसानंतर रात्री आपण किमान 10  ते 15 मिनिटे स्वतःला द्यायलाच हवीत. परंतु अनेकदा तर आपल्याला रिलॅक्स व्हायलाच वेळ मिळत नाही. त्यामुळेच मग आपला चेहराही खराब दिसू लागतो. त्यामुळेच आपण असे उपाय बघुया जे आपण आठवड्यातून किमान एकदा तरी करायला हवेत. जेणेकरून आपल्याला रिलॅक्स राहण्यासाठी मदत होईल.

 

केसांना तेल लावणे

केसांना तेल लावणे हा एक साधा सोपा उपाय आपण अगदी घरच्या घरी करु शकतो. खासकरुन कामावरुन आल्यानंतर, केसांना १० मिनिटे तेल लावल्याने मन शांत होण्यास मदत होते. याकरता कोकोनट आॅइल, ऑलिव्ह, बदाम किंवा इतर कोणतेही तेल वापरु शकतो. दररोज किमान 10 मिनिटे केसांना तेलाने मालिश केली तर केस मजबूत होतातच शिवाय डोकेदुखी, मायग्रेन इत्यादी अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो.

 

 

 


फेसशीट मास्क

अलीकडे चेहरा स्वच्छ करण्यासाठी आणि कमी वेळात चमक मिळवण्यासाठी फेसशीट मास्क खूप ट्रेंडी आहेत. स्पासारखा आराम हवा असेल तर, बाजारात उपलब्ध असलेले फेसशीट मास्क वापरून पाहू शकता. हा शीट मास्क चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्ही आरामात बसा. बाजारात उपलब्ध असलेले फेसशीट मास्क खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात अनेक प्रकारची रसायने असतात, म्हणून तुमच्या त्वचेचा प्रकार पाहूनच फेसशीट मास्क खरेदी करा. तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि सौंदर्यप्रसाधने शोषू शकत नसेल तर फेसशीट मास्क वापरू नका.

 

 

स्पा बाथ
स्पासारखा आराम मिळवण्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करतो. स्पा बाथ आपण घरच्या घरी सुद्धा करु शकतो. औषधी तेल, ड्राय ब्रश वापरुन आपण स्पासारखी ट्रिटमेंट घरी घेऊ शकतो. स्पा बाथ घेतल्यानंतर, डोळे मिटून थोडा वेळ एकटे बसा. यामुळे मन शांत होईल आणि शरीरालाही आराम मिळेल.

 

 

 


ऑइल स्पा मसाज
शरीर आणि मनाला आराम देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ऑइल स्पा मसाज. हा मसाज प्रत्येक स्त्री पुरुषांची पहिली पसंती मानली जाते, कारण ते अगदी कमी खर्चात घरी सहज करता येते. ऑइल स्पा मसाजसाठी, प्रथम एका भांड्यात थोडे बॉडी ऑइल घ्या. त्यात थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळा. बॉडी ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल मिसळल्यानंतर, या तेलाने तुमचे पाय, हात आणि खांदे मसाज करा. मालिश केल्याने तुमच्या शरीराचा थकवा दूर होईल आणि तुम्हाला बराच काळ ऊर्जा मिळाल्यासारखे वाटेल.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;