मराठी माणसा एक हो…यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी

मराठी माणसा एक हो…यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने शिवसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने हिंदू  नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या सोहळ्याची संकल्पना माय मराठी अशी होती.  गिरगांव नाका येथून स्वागतयात्रेला सुरुवात झाली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 22 फुटाची भव्य मूर्ती आकर्षण ठरली.

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा चित्ररथ, मुंबईमध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, मुंबईत मराठी माणसाची होणारी गळचेपी, मराठी माणसा एक हो…संयुक्त महाराष्ट्राच्या लढयासाठी परत एकदा सज्ज हो,  असे आवाहन चित्ररथाच्या माध्यमातून करण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा कधी बसवणार आणि अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा कधी उभारणार अशा विविध विषयावर आधारित चित्ररथ होते.  संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे संविधान वाचवा, देश वाचवा असा संदेश देणारा चित्ररथ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय देखावा सुद्धा सोहळ्यात होता.

गिरगाव येथे शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्यावतीने आयोजित शोभायात्रेमध्ये शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सहभागी झाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ढोलपथकासह ताल धरला आणि ढोल वाजवून सर्वांचा उत्साह वाढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;