दर्शनाला चाललेल्या भाविकांची भरधाव कार उलटली, तिघांचा मृत्यू; सात जखमी

दर्शनाला चाललेल्या भाविकांची भरधाव कार उलटली, तिघांचा मृत्यू; सात जखमी

मंदिरात दर्शनासाठी जात असताना अतिवेगामुळे कारवरील नियंत्रण सुटून उलटल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारमधील अन्य सात जण जखमी झाले आहेत. मयत आणि जखमी सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. मृतांमध्ये आई-वडिल आणि सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

राजस्थानच्या ब्योर जिल्ह्यात रविवारी ही घटना घडली. एकाच कुटुंबातील 10 जण मंदिरात दर्शनासाठी चालले होते. यादरम्यान अचानक वाहनासमोर एक जनावर आले. जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार अनेकदा उलटून रस्त्याच्या कडेला पडली.

अपघातात पुखराज कुमावत, पत्नी कुमावत आणि त्यांची 6 वर्षाचा मुलगा यश्मित यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले. कुटुंबातील अन्य सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;