कोण उभारणार ‘महाराष्ट्र केसरी’च्या जेतेपदाची गुढी!

कोण उभारणार ‘महाराष्ट्र केसरी’च्या जेतेपदाची गुढी!

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला नांदेडचा शिवराज राक्षे व मुंबई उपनगरचा पृथ्वीराज पाटील यांनी गादी विभागातून 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. दुसरीकडे माती विभागातून सोलापूरचा वेताळ शेळके व अकोल्याचा प्रशांत जगताप यांनी फायनल गाठली. आता दोन्ही विभागातून कोण बाजी मारत महाराष्ट्र केसरी स्पर्धेची फायनल गाठणार आणि त्यानंतर कोण मानाची चांदीची गदा उंचावून महाराष्ट्र केसरी किताबाच्या जेतेपदाची गुढी उभारणार याकडे कुस्तीशौकिनांच्या नजरा लागल्या आहेत.

कर्जत येथील श्री संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. उद्या सायंकाळी  5वा. अंतिम लढत रंगणार आहे. आमदार रोहित पवार यांच्यावर या स्पर्धेच्या नियोजनाची जबाबदारी असून शनिवारी त्यांनी तयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागासाठी सोलापूरचा वेताळ शेळके विरुद्ध सांगलीचा सनी मदने यांच्यामध्ये उपांत्य फेरीची लढत झाली.  दुसऱ्या उपांत्य लढतीत अकोले येथील प्रशांत जगताप विरुद्ध नांदेडचा अनिल जाधव यांच्यात झाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;