महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार करत खंडणीची मागणी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार करत खंडणीची मागणी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला रेल्वे पोलीस अधिकारीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने महिलेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी 20 लाख रुपयांची खंडणीही मागितली. याप्रकरणी नेहरु नगर पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने पीडितेशी लग्नही केले होते. आरोपी 2021 ते जानेवारी 2025 दरम्यान महिलेवर वारंवार अत्याचार केला. मुलुंड, अंधेरी, कल्याण, चेंबूर आणि लोणावळा यासह विविध ठिकाणी पीडितेवर अत्याचार केला. यावेळी आरोपी पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. या फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर करत आरोपीने पीडितेकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. आरोपीचा एक मित्रही धमक्यांमध्ये सहभागी होता.

आरोपीचे आधीच लग्न झाले होते. आरोपीचा मित्र आणि पत्नीनेही पीडितेकडून 10 लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आरोपीच्या आईने पीडितेला शिवीगाळ केली. पीडितेच्या तक्रारीवरून, नेहरू नगर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, 2021 ते जानेवारी 2025 दरम्यान या घटना घडल्या. आरोपींनी मुलुंड, अंधेरी, कल्याण, चेंबूर आणि लोणावळा यासह विविध ठिकाणी पीडितेवर हल्ला केला. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;