म्यानमारमध्ये भूकंपातील मृतांची संख्या 1000 वर; मदतीसाठी हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू

म्यानमारमध्ये भूकंपातील मृतांची संख्या 1000 वर; मदतीसाठी हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू

म्यानमार आणि थायलंड हे देश शुक्रवारी मोठ्या भूकंपाने हादरले. म्यानमारमधील भूकंपातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत यात 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 2376 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक आपत्तीत हिंदुस्थानने म्यानमार आणि थायलंडला मदत पुरवली आहे. या देशांच्या मदतीसाठी हिंदुस्थानचे ‘ऑपरेशन ब्रह्मा’ सुरू झाले आहे. आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ही जहाजे 40 टनांचे जीवनावश्य साहित्य घेऊन यंगून बंदराकडे निघाली आहेत.

म्यानमार आणि शेजारील थायलंड शक्तिशाली भूकंपाने हादरले. शुक्रवारी झालेल्या भूकंपाची क्षमता 7.7 रिश्टर स्केल इतकी होती. त्यानंतरही म्यानमारला भूकंपाचे धक्के बसत आहे. शनिवारी सकाळी अफगाणिस्तानात 4.2 तीव्रतेचा भूकंप झाला. शनिवारी दुपारी पुन्हा म्यानमारला भूकंपाचे धक्के बसले असून त्याची तीव्रता 5.10 एवढी मोजण्यात आली.

भूकंपामुळे तिथे मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. आतापर्यंत 1002 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2376 लोक जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे 5.16 वाजता अफगाणिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीपासून 180 किमी खोलीवर झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी होती. म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपाच्या एका दिवसानंतर हा भूकंप आला आहे.

म्यानमार आणि थायलंडमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपांमुळे इमारती, पूल आणि बौद्ध मठ उद्ध्वस्त झाले. जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक असलेल्या म्यानमारमध्ये मोठी हानी झाली आहे. विनाशकारी भूकंपाचा फटका बसलेल्या म्यानमारला हिंदुस्थानने 15 टन मदत साहित्य पाठवले आहे. हवाई दलाचे C-130J सुपर हरक्यूलिस विमान हिंडन एअर फोर्स स्टेशनवरून म्यानमारसाठी रवाना झाले आणि त्यात तंबू, स्लीपिंग बॅग्ज, ब्लँकेट, तयार जेवण, पाणी शुद्धीकरण करणारे यंत्र, स्वच्छता किट, सौर दिवे, जनरेटर सेट, आवश्यक औषधे (पॅरासिटामॉल, अँटीबायोटिक्स, कॅन्युला, सिरिंज, हातमोजे, कापसाच्या पट्ट्या, मूत्र पिशव्या इत्यादी) यांचा समावेश होता. तसेच आयएनएस सातपुरा आणि आयएनएस सावित्री ही जहाजे 40 टनांचे जीवनावश्य साहित्य घेऊन यंगून बंदराकडे निघाली आहेत. संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;