विठ्ठलभक्तांना खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित

विठ्ठलभक्तांना खोल्या नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ऑनलाइन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

  • भक्तनिवासातील खोल्यांची ऑनलाइन नोंदणी करता येणार

मंदिर समितीने कार्यालयीन कामकाज गतिमान करण्याच्या दृष्टीने व भाविकांना ऑनलाइन सोयी-सुविधांच्या अनुषंगाने संगणक प्रणाली सेवाभावी तत्त्वावर मोफत उपलब्ध करून देण्याची तयारी टीसीएस कंपनीने दर्शविली होती. त्याबाबत मंदिर समितीची 3 मार्च रोजी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये टीसीएस कंपनीकडून संगणक प्रणाली विकसित करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे ऑनलाइन पद्धतीने खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता भाविकांना https://online.vitthalrukminimandir.org.in/#/login या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या खोली नोंदणी करता येणार आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास भक्तनिवास येथून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भाविकांनी यापुढे मंदिर समितीच्या भक्तनिवास येथे निवासासाठी वरील अधिकृत संकेतस्थळावरून किंवा ऑफलाईन पद्धतीने खोली काऊंटर बुकिंग करावे, असे आवाहन यावेळी श्रोत्री यांनी केले.

  • इमारतीस ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र

मंदिर समितीचे पंढरपूर शहरात सर्व्हे नं. 59 येथे सुसज्ज भक्तनिवास इमारत आहे. यामध्ये गरम पाण्याची सोय, उद्वाहन, प्रशस्त पार्किंग, मिनरल वॉटर, वातानुकुलित यंत्रणा, तबक उद्यान, उपहारगृह, अग्निशमन यंत्रणा, सुरक्षा, स्वच्छता व्यवस्था व इतर अनुषंगिक सोयी-सुविधा उपलब्ध असून, या इमारतीस ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र प्राप्त आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;