आश्चर्य! ज्यूस विक्रेत्याला 7.79 कोटींची कर नोटीस
उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील ज्यूस विक्रेते रईस अहमद (35) यांना तब्बल 7.79 कोटींची आयकर नोटीस मिळाल्याने एकच खळबळ माजली. ते प्रतिदिन जेमतेम 500 ते 600 रुपयांची कमाई करतात. मात्र एवढय़ा मोठय़ा रकमेची थकबाकी मागणारी आयकर नोटीस पाहून सारेच अवाक झाले. आयकर विभागाकडून कुरिअरद्वारे पाठवण्यात आलेली नोटीस 18 मार्च रोजी त्यांना प्राप्त झाली. तसेच 28 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रईस यांचे येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात छोटेसे दुकान आहे. ‘मला आयकर वकिलाशी सल्लामसलत करण्याचा अनेकांनी सल्ला दिला. उत्तर देण्यापूर्वी बँक खात्याचे रेकॉर्ड गोळा करण्यास सांगितले आहे. पण, ही नोटीस पाहताच मला धक्काच बसला. या संकटाचा सामना कसा करायचा हे ठाऊक नाही. मी माझ्या वृद्ध आणि आजारी पालकांचा आधार आहे,’ असे रईस यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List