Chandrapur: पेट्रोल पंपावर ‘चिल्लर’ नाकारले, ग्राहक संतापले

Chandrapur: पेट्रोल पंपावर ‘चिल्लर’ नाकारले, ग्राहक संतापले

चंद्रपूर शहरात एका पेट्रोल पंपावर ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकाला मिळालेल्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रपूर शहरातील ताडोबा मार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या बियाणी पेट्रोल पंपावरील ही घटना आहे. पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने 10 रुपयाचे 9 शिक्के दिले. मात्र, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला आणि ‘आमच्या पंपावर नाणी चालत नाहीत, फक्त रोकडच स्वीकारली जाते’, असे सांगितले. ग्राहकाकडे नोटा नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पंप व्यवस्थापनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, देशातील कोणतेही वैध नाणे किंवा नोटा स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, बियाणी पेट्रोल पंपावर हा नियम पाळला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पेट्रोल पंप मालकावर कारवाई करण्याची आणि संबंधित पंप बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;