पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प- उद्धव ठाकरे

आताचा अर्थसंकल्प हा हताश आणि निरर्थक होता अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, पाशवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक अर्थसंकल्प होता. हताश आणि निरर्थक असा हा अर्थसंकल्प होता. ज्या ज्या गोष्टी निवडणूक जिंकण्यासाठी थापारुपाने मारल्या होत्या, त्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. ही अस्वस्थता लपवणारं, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. या अधिवेशनात ज्या गोष्टी यांनी सांगितल्या होत्या. हे सरकार जेव्हा स्थापन झालं, तेव्हा 100 दिवसांत आम्ही काय करणार हा एक संकल्प त्यांनी केला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरू आहेत. हमीभावापेक्षा कमी भाव शेतमालाला मिळतोय. 100 दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या काय योजना आहेत किंवा बोलण्यात आल्या आहेत किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याच्या पलीकडे त्यांच्या जो संकल्प जो होता करणार तो तर कुठे दिसलेला नाहिये. पण महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांत एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली. सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या झाली, स्वारगेटमध्ये बलात्कार झाला, रोज भ्रष्टाचाराचे प्रकरणं बाहेर येत आहेत. मुंबईचा रस्ता घोटाळा. आपल्या माध्यमातून जनतेसमोर आलेला आहे. संपूर्ण मुंबईत खोदकाम केलेले आहे. अॅडवान्स दिलेला आहे, कुणाला दिला आहे. याबाबत अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली होती. पण त्याचे पुढे काय झालं. त्यावर गुन्हे शाखा चौकशी करणार आहे का? हा भ्रष्टाचाराचा पैसै कुठे गेला, कुणाच्या खिशात गेला, कोणत्या कंत्राटदाराला हे कंत्राट मिळालं. याबाबत समाधानकारक उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला मिळालेली नाहीत. कर्जमाफी करणार होते, त्याबाबत कुठेही वाच्यता नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार होते, त्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. उलट लाडक्या बहिणींमध्ये वर्गवारी केली जाते, त्यांची कागदपत्र तपासली जाणार. म्हणजे तुम्ही मतं घेताना जे करायचं होतं ते केलं. आता माझ्या बहिणींची कागदपत्र तपासणार, आता नको ती योजना असं म्हणायची वेळ या बहिणींवर येतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरटकर सापडला, किती शिक्षा मिळणार हे माहित नाही, सोलापूरकर मस्तीमध्ये फिरतोय त्याबद्दल वाच्यता नाहिये.

तसेच नागपूरमध्ये दंगल झाली, बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपुरात जातीय दंगल झाली. आम्हाल असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. पण ज्यांच्या मनामध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोंब फुटलेले आहेत, ते कोंब अजून काही जात नाहियेत. मुख्यमंत्र्यांनाही तो प्रश्न पडला असेल की सगळंकाही देऊन सुद्धा हे असे का वागत आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की या अधिवेशनाचे फलित काय? अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने एक उत्तम गाणं दिलं, हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. हे गाणं संपूर्ण देशात प्रत्येकाच्या मुखात गुणगुणलं जातंय. हे चांगलं गाणं अधिवेशन काळात देशाला मिळालं असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;