संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराडच! ऍड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद; अनेक पुरावे सादर

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराडच! ऍड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद; अनेक पुरावे सादर

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडच असून हे सर्व प्रकरण संघटित गुन्हेगारीतून घडल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी मकोका न्यायालयासमोर केला.  त्यांनी सीसीटीव्ही, सीडीआर तसेच इतर महत्त्वाचे पुरावे सादर केले. पुढील सुनावणी आता 10 एप्रिल रोजी होणार आहे.

देशमुख हत्येप्रकरणी न्या. व्यंकटेश पाटवदकर यांच्या समोर सुनावणी सुरू झाली. हत्येचा कट कसा रचण्यात आला, मास्टरमाइंड कोण याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले. 1 डिसेंबर रोजी नांदूरघाट येथील तिरंगा ढाब्यावर वाल्मीक कराडने आरोपींना काय करायचे याची स्पष्ट सूचना दिली होती. सुदर्शन घुले हा या टोळीचा म्होरक्या, तो वाल्मीक कराड सांगेल तसेच करत होता हे देखील अॅड. निकम यांनी निदर्शनास आणले.

कृष्णा आंधळेचा कराड, चाटे यांना तीनदा फोन

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅड. उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदाच आरोपींमध्ये झालेल्या मोबाईल संभाषणाचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यात फरार आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीनदा मोबाईलवरून कॉल केल्याचे उघड झाले आहे. या घटनेच्या अगोदर सुदर्शन घुले याने अवादा पंपनीच्या वॉचमनलाही मारहाण केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;