मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात वाढ; अमेरिकेचा अहवाल

मोदी सरकारच्या काळात अल्पसंख्याकांवरील हिंसाचारात वाढ; अमेरिकेचा अहवाल

अमेरिकेने USCIRF 2025 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालात मोदी सरकारच्या काळात हिंदुस्थानात अल्पसंख्यांकांवरील हिंसाचारत वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला आहे. तसेच देशातील गुप्तचर संस्था (रॉ) काही हत्येच्या कटात सहभागी असून रॉवर निर्बंध लादण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने हा अहवाल फेटाळून लावला आहे.

यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (USCIRF) ने अलीकडेच हिंदुस्थानातील अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भेदभाव यावर त्यांचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. अहवालात, आयोगाने भारताच्या गुप्तचर संस्थेवर रॉवर हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या कथित भूमिकेसाठी बंदी घालण्याची शिफारस केली आहे. 2024 मध्ये भारतात धार्मिक अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भेदभाव वाढतच गेल्याचे नमूद केले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने मुस्लिम आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोपही या अहवालात करण्यात आला आहे.

USCIRF ने आपल्या अहवालात हिंदुस्थानची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) वर शीख फुटीरतावाद्यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाखाली, USCIRF ने RAW वर बंदी घालण्याची शिफारस केली. अमेरिकन पॅनेलने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धार्मिक स्वातंत्र्याच्या उल्लंघनासाठी हिंदुस्थानला ‘विशेष चिंतेचा देश’ घोषित करण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्र सरकारने हा अहवाल फेटाळून लावला आहे. यूएससीआयआरएफचा अहवाल “पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित” आहे. तसेच या आयोगाला ‘चिंतेचा विषय’ म्हणून घोषित केले पाहिजे, असे म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;