भाजप नेत्याची गोळी घालून हत्या, पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु

भाजप नेत्याची गोळी घालून हत्या, पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु

भरदिवसा भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी घडली. अनिल महातो उर्फ ​अनिल टायगर असे हत्या झालेल्या नेत्याचे नाव आहे. अनिय महातो हे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. कांके चौकाजवळील चहाच्या टपरीवर उभे असतानाच महातो यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात महातो यांचा जागीच मृत्यू झाला. झारखंडमधील रांची येथील कांके चौकात ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच कांके पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महातो यांच्या कुणी आणि कोणत्या कारणातून हल्ला केला याबाबत अद्याप समजले नाही. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. या हत्येमुळे रांचीतील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी कांके चौकात चक्काजाम केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;