विना हेलमेट दुचाकी चालवल्याप्रकरणी तरुणाला 10 लाखांचा दंड, वाहतूक विभागाचा अजब कारभार

विना हेलमेट दुचाकी चालवल्याप्रकरणी तरुणाला 10 लाखांचा दंड, वाहतूक विभागाचा अजब कारभार

अहमदाबादमध्ये वाहतूक विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विना हेलमेट दुचाकी चालवल्याने ट्रॅफिक पोलिसांनी तरुणाला तब्बल 10 लाख 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ई-चलन रद्द करण्यासाठी तरुण गेल्या 11 महिन्यांपासून ट्रॅफिक पोलीस कार्यालय आणि कोर्टात खेटा मारत आहे.

अनिल हा तरुण कायद्याचा विद्यार्थी असून उदरनिर्वाहासाठी तो पान टपरी चालवतो. 11 एप्रिल 2024 रोजी तो आपल्या अ‍ॅक्टिव्हावरून दुकानातील सामान आणण्यासाठी गेला होता. सामान घेऊन येत असताना त्याला ट्रॅफिक पोलिसांनी रोखले आणि त्याचे लायसन्स तपासले. लायसन्स तपासून पोलिसांनी त्याला सोडून दिले.

अनिल दुकानावर पोहचताच त्याला 500 रुपयांचा चलनचा मॅसेज आला. अनिलने पोलिसांशी संपर्क करुन चलानबाबत विचारले, तसेच त्याचक्षणी दंड भरला असता असे सांगितले. पोलिसांनी चलान घ्यायला नकार देत ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. ऑनलाईन चलन तपासले असता 10,00,500 रुपये रक्कम दाखवली. यानंतर अनिलला धक्काच बसला.

हे चलान रद्द करण्यासाठी अनिल पोलीस कमिश्नर आणि ई-चलान विभागाकडे पाठपुरावा केला. पोलिसांनी नियमांचे कारण पुढे करत ईमेल करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तरुणाने ईमेलही केला. मात्र चलान रद्द झाले नाही. अखेर त्याने मिर्झापूर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र न्यायालयाने पोलिसांशी संपर्क करण्यास सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;