Akola News – विटा वाहून नेणाऱ्या ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, भीषण अपघातात 10 विद्यार्थी जखमी; 3 गंभीर

Akola News – विटा वाहून नेणाऱ्या ट्रकची स्कूल व्हॅनला धडक, भीषण अपघातात 10 विद्यार्थी जखमी; 3 गंभीर

विटा वाहून नेणाऱ्या ट्रकने खासगी स्कूल व्हॅनला धडक दिल्याने भीषण अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. अकोल्यात पातुर बाळापूर रोडवरील वाडेगाव जवळ हा अपघात घडला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विटा वाहून नेणारा ट्रक बाळापूरकडून वाशिमकडे चालला होता. यादरम्यान ट्रकने स्कूल व्हॅनला धडक दिली. यानंतर ट्रक झाडावर आदळला. अपघातानंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी रास्ता रोको केला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;