Sikandar- ‘सिंकदर’ प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटातील संवादांना, दृश्यांना का लावली कात्री? वाचा सविस्तर

Sikandar- ‘सिंकदर’ प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटातील संवादांना, दृश्यांना का लावली कात्री? वाचा सविस्तर

ईदला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सलमान खानचे चाहते सिकंदरकडे डोळे लावून बसले आहेत. कधी एकदा थिएटरमध्ये जाऊन सिंकदर बघतोय असं सलमानच्या चाहत्यांना झालेलं आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट येत्या (30 मार्च) ला प्रदर्शित होत आहे. ईदनिमित्ताने दबंग खान पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीसाठी सिकंदरच्या रुपात येत आहे. ‘सिकंदर’ प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, निर्मात्यांनी चित्रपटामध्ये एक मोठा बदल केला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून UA 13+ प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘सिकंदर’ चित्रपटातील 14 मिनिटे आणि 28 सेकंदांचे फुटेज काढून टाकले आहे.

निर्मात्यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आता ‘सिकंदर’चा अंतिम रनटाइम 2 तास 15 मिनिटे आणि 47 सेकंद झालेला आहे.  याआधी सिंकदर चित्रपट हा तब्बल 2 तास 30 मिनिटे इतका होता.

निर्मात्यांनी कात्री लावण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे, ‘सिकंदर’च्या काही भागांवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी संवादांमध्ये थोडा फार बदलही जाणवेल. तसेच यामुळे जवळपास 26 दृश्यांवर मोठ्या प्रमाणात काटछाट करण्यात आली आहे. एवढेच नाही तर ‘सिकंदर’चे अनेक छोटे सीनही कापण्यात आले आहेत. “आते रहेंगे अब तो” अशी ओळ असलेला 56 सेकंदांचा सीनच काढून टाकण्यात आला आहे.

होळी साजरा करण्याचा एक सीन चित्रपटामध्ये 40 सेकंदांनी कमी करण्यात आला आहे. चित्रपटाचा वेग वाढवण्यासाठी हे महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे सध्याच्या घडीला सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;