डहाणूत तीन हजार क्विंटल भात भस्मसात, आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामाला आग लागली की लावली?

डहाणूत तीन हजार क्विंटल भात भस्मसात, आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामाला आग लागली की लावली?

आदिवासी विकास महामंडळाच्या घोळ येथील भात खरेदी केंद्रावरील गोडाऊनला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत तब्बल तीन हजार क्विंटल भात आणि 30 हजारांहून अधिक बारदाने भस्मसात झाली आहेत. या घटनेला 24 तास उलटून गेले तरी आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. एकीकडे पालघर जिल्ह्यातील शेतकरी आधीच संकटात आहेत. भात खरेदीच्या व्यवहारात काही घोटाळा झाला आहे काय? याची चर्चा असून हा घपला लपवण्यासाठी ही आग लागली की कोणी लावली? अशी ज्वलंत चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. दरम्यान, कासा पोलीस ठाण्याचे पोलीस वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

या आगीत गोडाऊनमधील सुमारे तीन हजार 70 क्विंटल भात आणि 30 हजारांहून अधिक बारदाने भस्मसात झाली. मध्यरात्री गोडाऊनमधून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झोपेतून जागे होत घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता.

दीड तासानंतर आग आटोक्यात

डहाणू नगर परिषद, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, जेसीपी मागवत जळलेले धान्य बाहेर काढण्यात आले.

गोडाऊनमध्ये मध्यरात्री आग लागली असल्याचा कॉल आला. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकला नाही.
– योगेश पाटील (व्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय जव्हार)

रात्रीच्या दरम्यान या गोडाऊनला आग लागल्याचे आम्हाला कळल्यावर आम्ही त्वरित भात खरेदी केंद्र अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. शासनाने या भागात सुरक्षितता उपाययोजना कराव्यात व स्थानिक स्तरावर अग्निशमन व्यवस्था उभारावी तसेच भात खरेदी गोडाऊनला सुसज्ज इमारत मिळावी. – सुदाम कदम (ग्रामपंचायत सदस्य)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;