लग्न केल्याने पत्नीचे मालक होत नाही; अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यावरून अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे

लग्न केल्याने पत्नीचे मालक होत नाही; अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यावरून अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे

पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवून तो फेसबुकवर पोस्ट केल्यावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने पतीवर ताशेरे ओढले. एकदा लग्न झाले म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीचे मालक होत नाही. तसेच लग्नामुळे पत्नीची स्वायत्तता किंवा गोपनीयतेचा अधिकार कमी होत नाही, असे बजावत आरोपपत्र रद्द करण्याची पतीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. पत्नीने पतीवर ठेवलेल्या विश्वासाचा आदर करणे अपेक्षित असल्याचे न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी स्पष्ट केले. आरोपपत्र रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळताना पत्नीचे फोटो अपलोड करून पतीने वैवाहिक नात्याच्या पावित्र्याचे उल्लंघन केले असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, तक्रारदार महिला याचिकाकर्त्याची पत्नी जरी असली तरी त्याला पत्नीचा अश्लील व्हिडीओ बनवण्याचा आणि तो व्हायरल करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे अतिरिक्त सरकारी वकिलांनी याचिकेला विरोध करत स्पष्ट केले. पत्नीलाही स्वतःचे हक्क, इच्छा आणि अधिकार आहेत. तिच्या शारीरिक स्वायत्ततेचा आणि गोपनीयतेचा आदर करणे हे केवळ कायदेशीर बंधन नसून नातेसंबंध जोपासण्यासाठी हे अत्यावश्यक आहे, असेही न्यायालयाने म्हटले. पतीने तिच्या नकळत संमतीशिवाय त्याच्या मोबाईलवरून त्यांच्यात झालेल्या शारीरिक संबंधांचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ आधी फेसबुकवर अपलोड केला व गावकऱ्यांना पाठवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;