Gudipadwa Puranpoli- गुढीपाडव्यासाठी परफेक्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळी करण्यासाठी या टिप्सचा वापर करा!

Gudipadwa Puranpoli- गुढीपाडव्यासाठी परफेक्ट मऊ लुसलुशीत पुरणपोळी करण्यासाठी या टिप्सचा वापर करा!

सणासुदीला आपल्याकडे हमखास पुरणपोळीचा घाट घातला जातो. मऊसुत पुरणपोळी, दुधाची वाटी आणि पुरणपोळीच्या जोडीला तूप.. साग्रसंगीत असा बेत आपल्याकडे सणासुदीला असते. आपल्याकडे नववर्षाचं स्वागत हे गुड्या उभारून केलं जातं. नववर्ष म्हणजे गोडाधोडाचं जेवण हे ओघानं आलंच. पण हे गोडाधोडाचं जेवण करताना काही आवश्यक तयारी आधी केली तर थकायला कमी होतं. खासकरून पुरणपोळीचा घाट घालायचा असेल तर, काही टिप्स आणि पूर्वतयारी करणे हे खूप गरजेचे आहे. पुरणपोळी म्हणजे साहित्य जमवण्यापासून सुरुवात असते. परंतु कधी कधी सर्व साहित्य असूनही पुरणपोळी काही नीट लाटता येत नाही. किंवा काही जणींच्या हातून तर पुरणपोळी सतत फुटत राहते. अशावेळी पुरणपोळी करण्याआधी काही टिप्स आपण विचारात घ्यायला हव्यात.

 

पुरणपोळी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

 

पुरणपोळी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहात. मैदा असो किंवा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या असो. सर्वात आधी तुम्ही पीठ व्यवस्थित चाळून घ्या.

 

पुरणपोळीचे पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतरच,  तेल लावून हे पीठ चांगले तिंबवून भिजवावे.

 

 

पुरणपोळीसाठी चणाडाळ ही किमान एकतास आधी भिजवून ठेवावी. चणाडाळ व्यवस्थित भिजल्यावर पुरणपोळी ही मऊ लुसलुशीत होते.

 

 

खमंग आणि लुसलुशीत पुरणपोळी बनविण्यासाठी गूळाचा वापर आणि साखरेचा वापर समप्रमाणातच करायला हवा.

 

पुरणपोळीची डाळ किमान कुकरमध्ये किमान चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायला हवी.

 

पोळी करताना सारण घट्ट झाल्यास हलक्या हाताने दुध शिंपडून सारण ओलसर करुन घ्यावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;