Nagar news – पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी वन विभागाच्या हद्दीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले

Nagar news – पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी वन विभागाच्या हद्दीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळले

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

प्रसाद सुरेश मरकड (वय – 24, रा. दुलेचांदगाव), भाग्यश्री शंकर वखरे (वय – 23, रा. माळेगाव, ता. पाथर्डी) अशी मयत प्रेमीजोडप्याची नावे आहेत.

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरातील घुमटवाडीच्या शिवारात या प्रेमीजोडप्याचे मृतदेह वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर आढळून आले आहेत. प्रसाद याचा एका झाडाला फाशी घेतलेल्या, तर भाग्यश्री हिचा जमिनीवर मृतदेह आढळून आला. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक हरीश भोये, विलास जाधव यांच्या पथकाने दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. घटनास्थळी दोघांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत होते. भाग्यश्रीच्या मृतदेहाचा काही भाग वन्यप्राण्यांनी खाल्लेला आढळून आला आहे.

हा परिसर वन विभागाचा असल्याने येथील परिसराला आग लागल्याने हे मृतदेह जळाले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना घटना घडली त्या बाजूलाच विषारी औषध व थंड पेयाच्या रिकाम्या बाटल्या मिळाल्या आहेत. पोलीस सर्व बाजूने तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या.

10 दिवसांपासून बेपत्ता

प्रसाद व भाग्यश्री हे दोघेही गेल्या दहा दिवसांपासून घर सोडून बाहेर होते. या दोघांच्या नातेवाईकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तशी तक्रार दाखल केली होती. प्रसाद मरकड हा अविवाहित तरुण होता, तर भाग्यश्री वखरे हिचा विवाह झाला असून, तिला एक मुलगा आहे. शनिवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;