Dark Choclate Benefits- आरोग्यासाठी छोटा चाॅकलेटचा तुकडा आहे खूपच किमयागार! वाचा डार्क चाॅकलेट खाण्याचे फायदे

Dark Choclate Benefits- आरोग्यासाठी छोटा चाॅकलेटचा तुकडा आहे खूपच किमयागार! वाचा डार्क चाॅकलेट खाण्याचे फायदे

चाॅकलेट केवळ लहान मुलांनाच आवडत नाही तर, मोठ्यांनाही चाॅकलेट तितकंच प्रिय आहे. परंतु कोणतं चाॅकलेट आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. डार्क चाॅकलेट म्हणजेच साधारण थोडं कडवट असं चाॅकलेट हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे मानलेले आहे.

 

डार्क चाॅकलेट खाण्याचे काय आहेत फायदे?

डार्क चॉकलेट फक्त चविष्टच नाही तर ते आरोग्यासाठीही खूपच फायदेशीर आहे. डार्क चाॅकलेटमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक असल्याने योग्य प्रमाणात सेवन केल्याने, आपल्याला निद्रानाशाची समस्या भेडसावत नाही.

 

डार्क चाॅकलेटमध्ये असलेले कॅफिन तणाव कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. म्हणून अनेकदा स्ट्रेसमध्ये असलेल्या पेशंटना डाॅक्टर चाॅकलेट खाण्याचा सल्ला देतात.

डार्क चाॅकलेटचा किमान एक तुकडा खाण्यामुळे आपले रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.

 

डार्क चाॅकलेटमध्ये आढळणारे फ्लेव्होनॉइड्स या तत्वामुळे कॅन्सरपासून बचाव होतो.

 

कोलेस्ट्राॅल नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चाॅकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्यही सुधारते.

 

 

 

काय आहे डार्क चॉकलेटची खासियत?
डार्क चॉकलेट फक्त चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही चांगले आहे? त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वे असतात, जी शरीर आणि मन दोघांसाठीही फायदेशीर असतात. हे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते. तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि मेंदूला सक्रिय ठेवते.

 

 

डार्क चॉकलेट आणि चांगली झोप यांचा काय संबंध आहे?
आपल्याला बरेचदा झोप न लागण्याची समस्या सतावत असते. अशावेळी डार्क चॉकलेट हा एक उत्तम पर्याय आहे. डार्क चाॅकलेटमध्ये मॅग्नेशियम असल्यामुळे, ताण कमी करण्यास आणि स्नायूंना आराम देण्यास मदत करते. त्यामुळे आपल्याला गाढ आणि शांत झोप मिळते.

 

 

 

किती डार्क चॉकलेट खावे?
तज्ज्ञांच्या मते दिवसातून २०-३० ग्रॅम (म्हणजे १-२ लहान तुकडे) डार्क चॉकलेट खाणे चांगले. यापेक्षा जास्त खाल्ल्याने साखर आणि कॅफिनचे प्रमाण वाढू शकते.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा. )

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;