300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर नो कमिशन 

300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर नो कमिशन 

कॉमर्स कंपनी ऍमेझॉन इंडियाने छोटय़ा व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यापुढे 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्रोडक्टस्वर व्यापाऱ्यांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही, अशी घोषणा ऍमेझॉन इंडियाकडून करण्यात आली आहे. देशात 300 रुपयांपेक्षा कमी किमतीचे 1.2 कोटीहून अधिक प्रोडक्टस् आहेत. छोटय़ा व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ऍमेझॉनने हे पाऊल उचलले आहे.

ऍमेझॉनचा हा निर्णय 125 कॅटेगरीला लागू होईल. यामध्ये बूट, फॅशन ज्वेलरी, ग्रॉसरी, होम डेकोर, ब्यूटी प्रोडक्ट्स, खेळणी, किचनमधील वस्तू, पाळीव प्राण्यांसंबंधी वस्तू यांचा समावेश आहे. ऍमेझॉनने एक किलोपेक्षा कमी वजनाच्या सामानांवरील हँडलिंग शुल्कात 17 रुपयांपर्यंत कपात केली आहे. कमी किमतीच्या कोटय़वधी प्रोडक्टस्वरील रेफरल शुल्क हटवले आणि शिपिंग खर्च कमी केल्याने विक्रेत्यांसाठी अधिक सोयीचे झाले आहे. हे नवीन शुल्क 7 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;