कुणाल कामराने वस्तुस्थिती मांडली, सत्ताधाऱ्यांना राज्य ठोकशाहीने चालवायचे आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

कुणाल कामराने वस्तुस्थिती मांडली, सत्ताधाऱ्यांना राज्य ठोकशाहीने चालवायचे आहे का? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने कुणाल कामराच्या एका विडंबनात्मक गाण्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. कुणाल कामराने त्याच्या गाण्याच्या विडंबनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ही टीका मिंधे गटाला चांगलीच झोंबली असून त्यांनी कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली. यावरूनच आता काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. कुणाल कामराच्या कवितेत एकही शब्द दुखावेल असे नव्हते. त्यांनी वस्तुस्थिती मांडली, तरी सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली, अशी टीका त्यांनी केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांनी टीका सहन करायची तयारी ठेवली पाहिजे. सत्ताधाऱ्यांना राज्य ठोकशाहीने चालवायचे आहे का?”, असा सवाल त्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. ते म्हणाले आहेत की, “ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला त्यांचे तोंड आणि घर सत्ताधाऱ्यांनी कधी फोडले नाही. आज मात्र स्वतःवर थोडीशी टीका होताच कलाकारांचे स्टुडिओ फोडतात.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;