ट्रेनमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीपासून बचावासाठी तरुणीची धावत्या गाडीतून उडी

ट्रेनमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीपासून बचावासाठी तरुणीची धावत्या गाडीतून उडी

तेलंगणात धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्काराचा प्रयत्न झाला. आरोपीपासून बचाव करण्यासाठी अखेर तरुणीने धावत्या गाडीतून उडी घेतली. यात तरुणी जखमी झाली आहे.

पीडित तरुणी मूळची अनंतपूरमधील उरवाकोंडा येथील रहिवासी असून खाजगी क्षेत्रात नोकरी करते. मेडचलमधील एका महिला वसतिगृहात ती राहत होती. मोबाईल फोन दुरुस्त करण्यासाठी तरुणी 22 मार्च रोजी सिकंदराबादला गेली होती. तेथून मेडचलला परतत असताना ही घटना घडली.

तरुणी महिला डब्यातून प्रवास करत होती. तिच्यासोबत अन्य दोन महिला प्रवासी होत्या. मात्र त्या अलवल रेल्वे स्थानकावर उतरल्या. यानंतर तरुणी डब्यात एकटीच होती. यावेळी 25 वर्षाचा एक तरुण महिला डब्यात घुसला आणि त्याने तरुणीकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. तरुणीने त्याला नकार देताच त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी तीने गुंडला पोचमपल्ली रेल्वे स्थानकाजवळ चालत्या ट्रेनमधून उडी घेतली.

रस्त्यावरून जाणाऱ्या काही महिलांनी तरुणीला पाहिले आणि त्यांनी आपत्कालीन सेवांना माहिती दिली. त्यानंतर तिला उपचारासाठी गांधी रुग्णालयात नेण्यात आले. तरुणीच्या डोक्याला, हनुवटीला, उजव्या हाताला आणि कंबरेला जखमा झाल्या आहेत.

याप्रकरणी सिकंदराबादमधील सरकारी रेल्वे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 75 (महिलेची विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि 131 (गुन्हेगारी बळाचा वापर) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे सिकंदराबाद जीआरपीचे निरीक्षक साई ईश्वर गौड यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;