एकनाथ शिंदेच गद्दार आणि चोर हे मुख्यमंत्री देखील मानतात का? आदित्य ठाकरे यांचा टोला

एकनाथ शिंदेच गद्दार आणि चोर हे मुख्यमंत्री देखील मानतात का? आदित्य ठाकरे यांचा टोला

मी जेव्हा तो व्हिडीओ पाहिला तेव्हा मला माहित नव्हतं की त्यात कुणाबद्दल बोललं जातंय. मुख्यमंत्री कुणाल कामराला माफी मागायला सांगत आहेत. पण कुणाची माफी मागायची? मुख्यमंत्री जर असं सांगत असतील तर ते देखील एकनाथ शिंदे यांना गद्दार आणि चोर मानतात का? असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

”गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनीच ठरवून दिलं. कुणाल कामराने कुणाचंच नाव घेतलं नव्हतं त्यामुळे मिरची लागायचं कारण नव्हतंच. पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी, टोळीनेच ठरवलं की आपला बॉस गद्दार व चोर आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेचें खासदार त्यांची सापासोबत तुलना करतात. एवढी नाचक्की कुणाची कधीच झाली नव्हती”, असाही टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

”ज्या महाराष्ट्रात नागपूर सारखी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. ज्या मुंबईत शो चालतात तिथे तोडफोड झाली. या महाराष्ट्रात पर्यटक व गुंतवणूकदार येतील का. एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करतायत. दोन महिन्यांपूर्वी मोदींनी कॉन्सर्ट इकॉनॉमीवर चर्चा केली होती. असे स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी येणार आहे का? मोदींनी तीन तासांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं लोकशाहीत टिकाटिपण्णी गरजेची असते. त्या विचाराला धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का? अशी तोडफोड केली म्हणून भुजबळसाहेबांवर पवार साहेबांनी कारवाई केली होती तशी कारवाई आता मुख्यमंत्री करणार आहेत का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;