IPL-2025 -CSK vs MI – चेन्नईसमोर मुंबईचे 156 धावांचं आव्हान; मुंबईचे फलंदाज ढेपाळले

IPL-2025 -CSK vs MI – चेन्नईसमोर मुंबईचे 156 धावांचं आव्हान; मुंबईचे फलंदाज ढेपाळले

IPL 2025च्या 18 व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 156 धावांचं माफक आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांसमोर मुंबईचे फलंदाज ढेपाळले. सलामीवर रोहित शर्मा याला भोपळाही फोडता आला नाही. तर इतर फलंदाजांना सुरुवात मिळाली, मात्र त्यांना त्या खेळीचं रुपांतर मोठ्या खेळीत करता आलं नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनाही अपेक्षित खेळी करता आली नाही. अखेरच्या क्षणी दीपक चहरने 28 धावांची निर्णायक खेळी केली. दीपकच्या या खेळीमुळे मुंबईला 150 पार पोहचता आलं.

मुंबईसाठी तिलक वर्मा याने सर्वाधिक धावा केल्या. तिलकने 25 बॉलमध्ये 31 रन्स केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव याने 26 चेंडूंत 29 धावांचं योगदान दिलं. रायन रिकेल्टन याने 13, विल जॅक्स 11, नमन धीर 17 आणि मिचेल सँटनर याने 17 धावा जोडल्या. रॉबिन मिंझ याने 3 धावा केल्या. तर ट्रेन्ट बोल्ट 1 धाव करुन माघारी परतला. तर अखेरच्या क्षणी दीपक चाहर याने स्फोटक बॅटिंग करत मुंबईची लाज राखली आणि पलटणला 150 पार पोहचवलं. दीपकने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 28 रन्स केल्या. तर एस राजुने नाबाद 1 धाव केली.

चेन्नईकडून नूर अहमदने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. नूरने 4 ओव्हरमध्ये 18 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. खलील अहमद याने तिघांना बाद केले. नॅथन एलिस आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;