SRH Vs RR – सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी! राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी केला पराभव, इशान किशनचे स्फोटक शतक

SRH Vs RR – सनरायझर्स हैदराबादची विजयी सलामी! राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी केला पराभव, इशान किशनचे स्फोटक शतक

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2025 ची सुरुवात विजयाने केली आहे. रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात संघाने राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 286 धावा केल्या होत्या. या विजयासह सनरायझर्सने आपल्या यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात केली.

सनरायझर्सची विस्फोटक फलंदाजी

सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ईशान किशनने आपल्या नव्या संघासाठी पहिल्याच सामन्यात 47 चेंडूत नाबाद 106 धावांची खेळी खेळली. ज्यात त्याने 6 षटकार ठोकले. ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 67 धावा, तर हेन्रिक क्लासेनने 14 चेंडूत 34 धावा केल्या. नितीश कुमार रेड्डीनेही 30 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या खेळीच्या जोरावर सनरायझर्सने 286 धावांचा डोंगर उभा केला.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांना महागात पडला. जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांच्यासह सर्व गोलंदाजांना सनरायझर्सच्या फलंदाजांनी चांगलेच कुटले.

राजस्थानची धावसंख्या 242 वर थांबली

287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल (1), नितीश राणा (11) आणि रियान पराग (4) हे फलंदाज सुरुवातीलाच बाद झाले. त्यानंतर संजू सॅमसनने 66 आणि ध्रुव जुरेलने 35 चेंडूत 70 धावांची खेळी खेळून संघाला सामन्यात टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. शिमरॉन हेटमायरने 23 चेंडूत 42 आणि शुभम दुबेनेही काही धावा केल्या, पण हे प्रयत्न अपुरे ठरले. राजस्थानची धावसंख्या 20 षटकांत 6 बाद 242 वर थांबली आणि संघाला पराभवाला सामोरे जावं लागलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;