रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य बंद करावी, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरेल; महिला आघाडी संपर्क संघटकांचा इशारा

रामदास कदम यांनी बेताल वक्तव्य बंद करावी, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरेल; महिला आघाडी संपर्क संघटकांचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा महिला आघाडीकडून जाहिर निषेध करण्यात येत आहे. यापुढे जर रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवरील वक्तव्य बंद केले नाही तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महिला आघाडी रस्त्यावर उतरेल असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्क संघटक नेहा रवींद्र माने यांनी दिला आहे. त्या रत्नागिरीत पत्रकारांशी बोलत होत्या.

नेहा माने म्हणाल्या की, दिशा सालियनचे वडील उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यानंतर रामदास कदम यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याविषयी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्वाच्च शब्द वापरले आहेत.अशा पध्दतीचे वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम यांचा आम्ही निषेध करतो असे नेहा माने म्हणाल्या.

शिवसेनेमुळे रामदास कदम यांना मोठी पदे मिळाली ते रामदास कदम आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी देश सोडून जाण्याची वक्तव्य करत आहे. अधिवेशन काळात साप साप म्हणून भुई धोपटून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा आम्ही महिला आघाडी निषेध करत आहोत. रामदास कदम यांनी यापुढे खालच्या पातळीवरील वक्तव्ये बंद केले नाही तर आम्ही महिला आघाडी रस्त्यावर उतरू असा इशारा नेहा माने यांनी दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;