कॅफेबाहेर फॅन्सची,पापाराझीची गर्दी पाहून सुहाना गोंधळली; कथित बॉयफ्रेंडने केलं प्रोटेक्ट अन्….

कॅफेबाहेर फॅन्सची,पापाराझीची गर्दी पाहून सुहाना गोंधळली; कथित बॉयफ्रेंडने केलं प्रोटेक्ट अन्….

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला नक्कीच कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. शाहरुखप्रमाणेच आता त्याची लेक सुहाना आणि मुलगा आर्यन यांनी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करत अभिनयात आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत आहेत. शाहरूखची लेक सुहाना खान देखील नेहमी चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. सुहाना खानचे नाव हे अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदासोबत जोडलं जातं आहे. त्यांच्या अनेक चर्चा होताना दिसतात. तसेच हे दोघेही एकमेकांना डेट कर असल्याची देखील चर्चा आहे. एवढंच नाही तर दोघे कार्यक्रमांमध्ये, पार्टीमध्येही अनेकदा एकत्र दिसतात. त्यामुळे त्यांच्या डेटींगच्या चर्चां नेहमीच जोरदार होत असतात.

कॅफेमधून बाहेर पडताना नेमकं काय घडलं? 

सुहाना व अगस्त्यचे फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर कायम व्हायरल होतं असतात. सध्या सुहानाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नुकतीच सुहाना खान मित्रांबरोबर पार्टी करताना दिसली. वर्सोवा येथील एका कॅफेमधून ती तिच्या ग्रुपसोबत बाहेर पडताना पापाराझींनी तिला स्पॉट केलं. यावेळी पापाराझी आणि चाहत्यांची सुहानाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याचाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

कथित बॉयफ्रेंडने केलं प्रोटेक्ट

‘व्हायरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर सुहाना खानचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पापाराझी व चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी तिच्याभोवती प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. ही गर्दी पाहून सुहाना थोडीशी गोंधळलेली दिसली. तेव्हा तिच्या मदतीला तिचे मित्र पुढे आलेले दिसले. पण तेव्हात सुहानाचा कथित बॉयफ्रेंड अगस्त्य नंदादेखील तिच्यासोबत होता. व्हिडीओमध्ये अगस्त्य तिला प्रोटेक्ट करताना दिसत आहे. तिला प्रोटेक्ट करत कॅफेतून बाहेर पडतो त्यानंतर तिला कारमध्ये बसवून थेट निघून जातो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. तसेच यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा आता जास्तच होऊ लागल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासून सुहाना-अगस्त्यच्या डेटींगच्या चर्चा 

सुहाना खान व अगस्त्य नंदाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघांनी 2023 मध्ये झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटातील सुहाना व अगस्त्यच्या अभिनयाच भरभरून कौतुकही करण्यात आलं. ‘द आर्चीज’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीपासून सुहाना व अगस्त्य एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

सुहाना अन् अगस्त्यच्या कामाबद्दल 

दरम्यान, सुहाना लवकरच शाहरुख खानसह ‘द किंग’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं चित्रकरण काही दिवसांत सुरू होईल. तसंच अगस्त्य ‘इक्कीस’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. 1971 मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानच्या एका बाप-लेकाच्या नात्याची कथा ‘इक्कीस’ चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;