पुरुषाचा मसाज महिला करू शकणार, तज्ञ समिती तयार करणार मार्गदर्शक तत्त्वे हायकोर्टात फडणवीस सरकारची माहिती

पुरुषाचा मसाज महिला करू शकणार, तज्ञ समिती तयार करणार मार्गदर्शक तत्त्वे हायकोर्टात फडणवीस सरकारची माहिती

स्पा, मसाज सेंटरमध्ये महिला पुरुषाचा व पुरुष महिलेचा मसाज करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाणार आहेत. हे काम 12 जणांच्या तज्ञ समितीला दिल्याची माहिती शुक्रवारी राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली.

स्पा, मसाज सेंटरवर पोलीस धाडी टाकतात व त्याचा नाहक त्रास या चालकांना होतो. हे टाळण्यासाठी स्पा, मसाज सेंटरचे नियमन करण्याकरिता 12 जणांची समिती तयार केली आहे. तसा शासन निर्णय 21 मार्च 2015 रोजी जारी केला आहे, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाला दिली. भिन्न लिंगी मसाजाला दिल्ली सरकारने परवानगी दिली होती. त्याला तेथील न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. याचा विचार करून महाराष्ट्रात यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास समितीला सांगितले आहे, असेही महाधिवक्ता सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना स्पा, मसाज सेंटरवाल्यांचे म्हणणे ऐका. या समितीत महिला अधिकाऱयांचाही समावेश करावा, अशी सूचना न्यायालयाने केली. या समितीत महिला अधिकारी आहेत, असे महाधिवक्ता सराफ यांनी स्पष्ट केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी समितीला 10 जूनपर्यंत मुदत दिली. सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी सुनावणीत सहकार्य केले.

समितीची जबाबदारी

  • स्पा, मसाज सेंटरचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.
  • दिल्ली सरकारने भिन्नलिंगी मसाजसाठी तयार केलेल्या नियमाला तेथील उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याचा विचार करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत.
  • मद्रास उच्च न्यायालयाने स्पा, मसाज सेंटरसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याचाही अभ्यास समितीने करावा.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;