वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा, युवासेनेच्या वतीने मागणी; कणकवली पोलिसांना दिले निवेदन

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा, युवासेनेच्या वतीने मागणी; कणकवली पोलिसांना दिले निवेदन

मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत आहे. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशी बेताल वक्तव्य करतात, पण नितेश राणे यांच्या भडखाऊ भाषणांमुळे राज्यातील युवक भडकले जात आहेत. तरुणांची नितेश राणेंच्या भडखाऊ भाषणांमुळे दिशाभूल होत आहे. मंत्री पदावर राहून असंवेदनशील वक्तव्य करत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी युवासेनेच्यावतीने कणकवली पोलिसांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे रोजगार, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल मंत्री राणे हे कधी बोलत नाहीत. पण रोज सकाळी उठून समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव कायम करत असतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगार, ठेकेदार यांची देणी बाकी आहेत त्याबद्दल राणे कधीच बोलताना दिसून येत नाहीत. राज्यातील युवकांची बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता यावर नितेश राणे कधी भाष्य करताना दिसून येत नाहीत, यावरून नितेश राणे यांना शांत असलेले राज्य हे अशांततेच्या मार्गांवर घेऊन जायचे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो, रोज उठून अशी भडखाऊ वक्तव्य करून दंगली घडवण्याच्या यांचा उद्देश असेल तर अश्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे युवासेनेच्यावतीने पोलिसांमार्फत करण्यात आली आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, गुरु पेडणेकर, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, मंगेश राणे, अविनाश सावंत, आशिष मेस्त्री, चेतन गुरव उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;